Monday, 10 July 2017

ती - २



ती अजूनही तिथं धंद्याला उभारते, कामावरून घरी येत असताना दररोज दिसते. रात्र कशीही गेली तरी अंधारातही मेकअप लख्ख उठून दिसतो. नेहमी इशारे करते. ट्रक ड्राइव्हर तिचं नेहमीचं गिऱ्हाईक. कधी १०० रुपये तर कधी १५०. कंडोम चे वेगळे पैसे. धंद्याचे वसूल पक्के आहेत. टवाळ पोरं त्रास देतात, दमदाटी करतात. टोळक्याने घुसतात आणि हात टाकायला बघतात. अश्लील शेरेबाजी. तरीही सहन करते ती. दारूने तुंबलेलं तोंड घेते तोंडात. तिला कधीही नशा चढत नाही. मेंदू स्थिर असतो. कधी एक, कधी दोन तर कधी तीन तीन सुद्धा घेते. पैसा कुणाला नकोय. तिच्यासाठी ओव्हरटाईमचं ते. कधी कधी ट्रक च्या मागे आडोसा भेटतो आणि तिथंही होऊन जातं, जे हवं असतं, दोघांनाही. त्याला शरीर अन् तिला पैसा.

तिला साथ मिळते हिजड्यांची. धंद्यात स्पर्धा होते, पण मिळून करतात ते काम. कितीही मर्द असला तरी समोर किन्नर दिसला की गप्पगार होतो. ती गाडीत बसून जाताना हा किन्नर गाडीचा नंबर नोट करून ठेवतो. ती भोगायचाचं पैसा घेत असली तरी त्यांच्या सुरक्षेची काळजी ते स्वतःच घेतात.

तिला अबला किंवा नारी वगैरे म्हणून उगाच अपमान नाही करायचा मला. भले भले काँटॅक्टस आहेत तिच्याकडे. पोलिसांचं कुठं आडलं तर पहिला नंबर तिला लावतात. धंदा असला म्हणून काय झालं स्वाभिमानाचा आहे. इज्जत विकून देखील स्वाभिमान जपते ती. कधी चकार शब्द काढत नाही. कुठली फिलॉसॉफी नाही. उलट दिसेल तेव्हा तिचा हसरा चेहरा. वाटतं कधीतरी कि थांबावं, आणि विचारावं तिच्या मनात आहे तरी काय? नक्कीच एक कथा दडलेली असणार. लख्ख शरीरावरचे व्रण भळभळत असणार. तिलाही लागत असेल भूक.. प्रेमाची..

- ललित जमदाडे
७०२०८१८१३७

Sunday, 9 July 2017

"समीक्षा.."

हो, हे स्वप्नच आहे

तू आणि मी
एकत्र बसलोय...
खूप दूर एकांतात
कुना एका झाडाखाली..

झुळझुळ वाहतोय वारा
मी वाचतोय
तुझ्यावर केलेली माझी कविता
आणि तू ऐकतेय डोळे मिटून..

सोबतच ऐकू येतेय पानांची फडफड..
आणि रात किड्याची किरकिर

मी तुला स्वप्न दाखवतोय
कवितेतून साकारतोय
"तुझं-माझं सोबतचं आयुष्य.."
तू अलगदच पकडलाय माझा हात..
आणि मी तुझ्या बोटांना..

"ना कशाची चिंता,
ना कुणाची पर्वा..
खरं-खोटं, चूक-अचूक
जिथे कसलीच भीती नाही
अश्या कुना एका टेकडीवर
आपलं घर..
भिंतीवर प्रेमाचा ओल असलेलं"

तु पण घेतेय डोळे मिटून
त्या कवितेचा आस्वाद..
कदाचित समीक्षाच करत असते मनात..

कविता संपते.. स्वप्न भंगते..

समीक्षा मात्र सुटत नाही..
खऱ्या-खोट्याची, चूक-अचुकची
माझ्या प्रेमाची, आपल्या आयुष्याची..

ना तिथे तू असते..
ना तिथे झाड असतं..
स्वप्नातल्या टेकडीचा पत्ता लागत नाही..
घराच्या भिंतिंचा ओलही दिसत नाही..

एकट्या खोलीमध्ये फक्त मी असतो,
सुरु असते पंख्याची किर्रर्र किर्रर्र..
डायरीचा कागद फडफड करत असतो,
माझ्याशीच बोलत असते माझी कविता..

ती शोधत असते तिची समीक्षा..
माझ्या आयुष्याची "समीक्षा.."

-तथागत

ती - १


कंबरेचा खुळखुळा होईपर्यंत दिवसभर पुरुषांना उरावर घेते आणि पुन्हा छाताड काढून धंद्याला उभारते. ताठतोंड खाली घालून गुपचूप नगरामध्ये घुसणारे हे इज्जतवाले बघितले की कीव येते. रांड मी आणि आलटून पालटून इथे येऊन पलंग बदलाणारे हे कोण? तूटक्या पलंगावर गुडघा रुतवून रुतवून घाम काढताना समोर दिसते ती फक्त मादी. नशीबचं फाटलं असल्यामूळं कंडोम फाटायची तितकी भीती नाही वाटत. कस्टमरच्या भरलेल्या तोबर्याची इतकी सवय झाली की, मलासुद्धा तंबाकू मळल्याशिवाय कंबरेखाली ओल जाणवतचं नाही. ब्लाउजचं वरचं बटन उघडं ठेवून धंदा करते . छाती लोंबलीये वाटलं तरी कृत्रिम फुगवटा आणून कस्टमरला माझ्याकडे खेचतेचं. पोरंबाळं आणि पोटाचा खड्डा भरण्यासाठी जी धंद्याला उभारते ना, ती रांड असते. तुमच्या लिंगात पावसाळा, हिवाळा, ताठरता आल्यानंतर जी मोकळं करते ती रांड असते. तोंडावर दार आपटून बायको हाकलून देते तेव्हा जी उरावर घेते, ती रांड असते. डोळे उघडायची शुद्ध नसते तेव्हा जी साडी फेकुन तुमच्यासमोर नागडी उभी राहते ती रांड असते. समाजात वसवस फिरणाऱ्या लाळघोट्यांना जी थंड करते ती रांड असते.

रांड क्या होती है तुम बेईमान क्या जानो? बायकोला घाबरून संडासात जाऊन गर्लफ्रेंड ला फोन लावणारे तुम्ही. दिसली बाई कि लाळ गाळणारे तुम्ही. रस्त्यावर उघड्या डोळ्याने पोरीला नागडे करणारे तुम्ही. रात्री तिच्या आठवणीत अंडरवियर ओले करणारे तुम्ही. प्रत्येक स्पर्शामध्ये उब शोधणारे तुम्ही. बाई लघवीला बसली तर वाकून बघणारे तुम्ही. सार्वजनिक मुतार्यांमध्ये कँमेरे लावणारे तुम्ही.. आपली फाटलेली चड्डी लपवण्यासाठी तिला उघडं पाडायचं. तिला रांड म्हणून स्वतःचं हसं करून घ्यायचं. कितीही झाकलं तरी काळं कधी गोरं होत नसतं. काळं ते काळंच.

रांड म्हणण्यासाठी रांडपण जाणावं लागतं. तिच्या शरीरात नाही, तर काळजात घुसावं लागतं. घामाचा पैसा ती पण कमवते. प्रत्येक फेसाचे पैसेदेखील मोजते. पोटात कळ मारली म्हणून लात कधी मारत नाही, आणि ब्लाउजमध्ये कोंबलेल्या नोटेचं इमान कधी  विसरत नाही..

- ललित जमदाडे
७०२०८१८१३७

नेहमीसाठी..

माझ्यातल्या मला
आणि तुझ्यातल्या तुला
कधी कळलंच नाही
कि, तुझ्यातला मी..
माझ्यातली तू..
केव्हाचेच
समरस झालेत एकमेकात..

भकास आणि उदास दिसणाऱ्या वाटेवर
बेशरमाचं झाड बघून मनाला प्रसन्न करणारा मी..

मोहवून टाकणाऱ्या गुलाबाच्या बगिच्यात 
फुललेल्या गुलाबांना न्याहाळत,
मनाला सावरत बसलेली तू

गोंजारत आहोत एकमेकांच्या
तुच्छ भावनांना..

तुला माझ्या वाटेवर दिसत असतील
तुझ्या बगिच्यातली गुलाबाची फुलं..
आणि मला तुझ्या बगिच्यात दिसतय
माझं बेशरमाचं झाड..

पण स्वप्नवत वाटावं
इतकं भयाण आहे वास्तव..

माझ्या वाटेवर कधी शोभणारच नाही गुलाबाचं अस्तित्व..
आणि तुझ्या बगिच्यातही अमान्य होईल माझं बेशरमाचं झाड..

म्हणून शेवटी,
तुझा बगीचा तुलाच सुपूर्द
आणि माझी वाट मला..

माझ्यातल्या मला
आणि तुझ्यातल्या तुला
जाणून बाहेर काढावं लागेल
तुझ्यातला मी..
माझ्यातली तू..
नेहमीसाठी..