कंबरेचा खुळखुळा होईपर्यंत दिवसभर पुरुषांना उरावर घेते आणि पुन्हा छाताड काढून धंद्याला उभारते. ताठतोंड खाली घालून गुपचूप नगरामध्ये घुसणारे हे इज्जतवाले बघितले की कीव येते. रांड मी आणि आलटून पालटून इथे येऊन पलंग बदलाणारे हे कोण? तूटक्या पलंगावर गुडघा रुतवून रुतवून घाम काढताना समोर दिसते ती फक्त मादी. नशीबचं फाटलं असल्यामूळं कंडोम फाटायची तितकी भीती नाही वाटत. कस्टमरच्या भरलेल्या तोबर्याची इतकी सवय झाली की, मलासुद्धा तंबाकू मळल्याशिवाय कंबरेखाली ओल जाणवतचं नाही. ब्लाउजचं वरचं बटन उघडं ठेवून धंदा करते . छाती लोंबलीये वाटलं तरी कृत्रिम फुगवटा आणून कस्टमरला माझ्याकडे खेचतेचं. पोरंबाळं आणि पोटाचा खड्डा भरण्यासाठी जी धंद्याला उभारते ना, ती रांड असते. तुमच्या लिंगात पावसाळा, हिवाळा, ताठरता आल्यानंतर जी मोकळं करते ती रांड असते. तोंडावर दार आपटून बायको हाकलून देते तेव्हा जी उरावर घेते, ती रांड असते. डोळे उघडायची शुद्ध नसते तेव्हा जी साडी फेकुन तुमच्यासमोर नागडी उभी राहते ती रांड असते. समाजात वसवस फिरणाऱ्या लाळघोट्यांना जी थंड करते ती रांड असते.
रांड क्या होती है तुम बेईमान क्या जानो? बायकोला घाबरून संडासात जाऊन गर्लफ्रेंड ला फोन लावणारे तुम्ही. दिसली बाई कि लाळ गाळणारे तुम्ही. रस्त्यावर उघड्या डोळ्याने पोरीला नागडे करणारे तुम्ही. रात्री तिच्या आठवणीत अंडरवियर ओले करणारे तुम्ही. प्रत्येक स्पर्शामध्ये उब शोधणारे तुम्ही. बाई लघवीला बसली तर वाकून बघणारे तुम्ही. सार्वजनिक मुतार्यांमध्ये कँमेरे लावणारे तुम्ही.. आपली फाटलेली चड्डी लपवण्यासाठी तिला उघडं पाडायचं. तिला रांड म्हणून स्वतःचं हसं करून घ्यायचं. कितीही झाकलं तरी काळं कधी गोरं होत नसतं. काळं ते काळंच.
रांड म्हणण्यासाठी रांडपण जाणावं लागतं. तिच्या शरीरात नाही, तर काळजात घुसावं लागतं. घामाचा पैसा ती पण कमवते. प्रत्येक फेसाचे पैसेदेखील मोजते. पोटात कळ मारली म्हणून लात कधी मारत नाही, आणि ब्लाउजमध्ये कोंबलेल्या नोटेचं इमान कधी विसरत नाही..
- ललित जमदाडे
७०२०८१८१३७
No comments:
Post a Comment