Friday, 13 January 2017

मी तिथेच सापडेन तुला..

बघ
इकडे तिकडे
दाही दिशांना
कुठे दिसतोय मी?
जाणवतंय कुठे माझं अस्तित्व?
भोवताल बघ
आणि परत परत शोध
खरंच आहे का मी तिकडे?
कि मी नाहीच तुझ्या आसपास?

तुला जाणवणारच नाही माझी उब.. बाहेर

आता शोध स्वतःत..
मनात.. डोक्यात.. स्वप्नात..
आता बघ जाणवतो का मी..
भासतं का माझं अस्तित्व..
मला खात्री आहे
मीही तिथेच सापडेन तुला..
कारण, मी तुझ्यातच आहे
जशी माझ्यात असते तू.. नेहमीच.

मी माझ्यातून तुला जाऊच दिलं नाही
आणि तुझ्यातूनही मी बाहेर आलो नाही..
तरीही बाहेर शोधतेस मला..

आता फक्त एक काम कर..
डोळे मीट..
मला शोध..
स्वतःत.. स्वतःच्या मनात..
मी तिथेच सापडेन तुला..
हो.. मी तिथेच सापडेन तुला..

- तथागत




कलम

तेरी यादों ने आज फिर मुझे मगरूर किया है
मेरी कलम ने आज मुझे फिर इश्क़ लिखने से मजबूर किया है

चार इश्क़ करने वाले चार अलग दिशाओ में खो गए
फिर कभी यही मिलेंगे की दुनिया गोल है

मेरी आँखों पर पड़कर इन सूरज की किरणों ने मुझे फिर तुझसे सपनो में दूर किया है
मेरी कलम ने आज मुझे फिर इश्क़ लिखने से मजबूर किया है

मैं भी पहले यु इश्क़ को किताबो में ढूंढा करता था
की किसी मोड़ पर तुम मिले और नजरिया बदल गया

की फिर मैंने तुम्हे इन हवाओ में महसूस किया है
मेरी कलम ने आज मुझे फिर इश्क़ लिखने से मजबूर किया है

- हिमांशु कडू

Monday, 9 January 2017

तू करशील का Non Virgin मुलीशी लग्न ?




सहज ऑफिस मध्ये आपला काम करत बसलो होतो; जरा आळस आला तर बाजूलाच बसलेल्या सहकाऱ्याशी बोलायला सुरु केलं... बोलणं तसं फारच जास्त आवडते मला...
इकडलं तिकडलं जसं-जसं सुचत होतो; ते बोलत होतो... कुठूनतरी मुलींचा Topic निघाला आणि नेमकंच तो बोलता बोलता म्हणला “Shubham, Would You Marry a Non-Virgin Girl ? Or अगर आपको शादी के बाद पता चले कि आपकी बिवी पहले भी किसी के साथ सो चुकी है तो आप क्या करेंगे? तो हिंदी भाषिक आहे ना म्हणून हिंदीत विचारलं.
आता काय बोलावं हेच कळेना; त्याने हा प्रश्न का बरं विचारला असावा तेही कळेना पण उत्तर देणं हे गरजेचं होतं.. आणि एका शब्दात तर उत्तर देऊन झालं नसतं.. म्हणून मी आपला “स-संदर्भ स्पष्टीकरण” द्यायला सुरुवात केली.
See Bro; Actually मी हे सगळं हिंदी मध्ये म्हटलं पण मराठी मध्ये लिहितोय ते कसं आहे न; माझ्यासाठी कोणती गोष्ट Matter करत असेल न; तर ते आहे तिचं Character आणि Virginity काही कुणाच्या Character चं मोजमाप करण्याचं योग्य ते साधन नाहीये. होऊ शकते तिच्यावर “अत्याचार” झाला असेल किंवा असाही होऊ शकते कि तिचं त्या मुलावर जीवापाड प्रेम होतं पण त्याने तिचा वापर केला (आजकाल ही गोष्ट सर्वात जास्त होते; General Knowledge म्हणून सांगत आहे) किंवा वेळप्रसंगी काही कारणं लक्षात घेता तिला असं करावं लागलं असेल.
हो; करीन ना... अश्या मुलीशी लग्न करायला हरकतच काय आहे ?
आणि Moreover मी असं समझतो कि ते माझं सौभाग्य राहील; कि मी तिला एक चांगली Life देऊ शकेन जेव्हा तिच्यासोबत असलं काही वाईट प्रसंद घडले आहेत.”
पूर्ण भाषण आठवत नाही मला; पण असं काहीतरी बोललो होतो मी.
“लग्न” हा प्रत्येकाच्या जीवनातला एक प्रमुख Phase आहे. काही २-४ महोदय सोडले तर बाकी सगळे कधी ना कधी लग्न करतीलच J आपल्या “सनी वहिनी” ने पण लग्न केलंच की...
लग्नानंतर एक नवरा म्हणूनही त्याला मुलभूत अधिकार मिळून जात नाही कि तिच्या जुन्या आयुष्यात कोपरखळी करून तिचं “सगळं” जाणून घ्यावं. ती खाजगी मालमत्ता नाहीये ना; ती एक व्यक्ती आहे; तिच्याही भावना आहेत; काही वैयक्तिक आयुष्य आहे; नाती आहे; आणि त्यावर फक्त तिचा अधिकार आहे; तिने ते कुणाशी Share करायचं आणि कुणाशी नाही. जुन्या आयुष्याबद्दल विचारलेल्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरदेही आहे असाही मुळीच नाही, जर नात्यातली पारदर्शता तिला जपायची असेल तर ती स्वइच्छेने Share नाहीतर उगीच त्या गोष्टीत नाक खुपसून अर्थ नाही.
पण मग आपली So Called भारतीय संस्कृती “लग्नाआधी शारीरिक संबंध” या गोष्टीला मान्यता देत नाही; माणसांनी, I Actually Mean पुरुषांनी पोरींचे दोन वर्ग केले आहेत; एक Date वर न्यायला दुसऱ्या लग्न करायला.
एकतर Date वर चालणारी मुलगी पाहिजे, त्यांच्याशी Flirt करायला पाहिजे; झोपायला पाहिजे, In Short ती पोरगी Open” Minded पाहिजे... पण लग्नाची गोष्ट आली तर त्यांना मुलगी पाहिजे; सुंदर, सभ्य, सोज्वळ आणि महत्त्वाचं म्हणजे Virgin पाहिजे, खरंच?
ठीक आहे ना; तू “पवित्र” आहे तर एकदा आपण ही गोष्ट Consider पण करू कि ती पण असावी; पण भाऊ आपणच २७ विहिरीचं पाणी प्यायलो आहोत आणि तिने ग्लास भर कुणाला दिलं असेल तर आपल्याला त्यातही Problem..
आणि भाऊ तू वाईट वाटून घेऊन नको, तुलाच दोष देत नाहीये मी; जर तूच आजपर्यंत “त्या”ची घाई केली नाही तर तू एक “सुंदर” मुलगी Deserve करतोस. इथे सुंदर दिसण्यावरून म्हणायचं  नाही आहे. आणि कसं आहे ना बाई; चुकीचं काहीच नाही पण गरजेचंही नाहीच.
आता इतकं सगळं वाचल्या नंतर कुणाचा “स्वाभिमानी पुरुषी आत्मा” दुखावला असेल किंवा कुण्या मुलीच्या “अंतरआत्म्याला” ठेच लागली असेल तर मी मनापासून म्हणतोय;
Please वाचन बंद करा आणि रडत बसा कारण मला फरकच पडला नाही; तुम्हाला वाईट वाटल्याने.

- शुभम न दातारकर

एक नजर

















कॉलेजच्या रस्त्यावर अशी एक घटना घडून गेली,
रागाने बघणारी एक नजर अशी मनाला घायाळ करून गेली...

येत जाता भिडणारी नजर आज अशी जादू करून गेली,
मला सर्व काही विसरायला लावून माझ सर्वस्व लुटून गेली...

होश असायचो स्वतःच्या धुंदीत; आज माझी धुन्द हरपून गेली;

दुसऱ्याची थट्टा करता करता आज माझीच थट्टा घडून गेली;
रागाने बघणारी एक नजर अशी मनाला घायाळ करून ती गेली....

- शुभम न दातारकर (संकलित)

शॉर्टकट्स


आपल्या आजोबांच्या पिढीची नावे ‘जयसिंगराज’ पद्धतीची, बाबांच्या पिढीची नावे ‘जयसिंग’ पद्धतीची, आपल्या पिढीची नावे ‘जय’ पद्धतीची.. आता आपल्या मुलांची नावे???? लिहा बाराखडी. क, ख, ग… ज्ञ.

जगणं किती शॉर्टकट केलाय आपण, अगदी मेसेज सारखं.. कुणाला थँक्यू लिहायचं असलं कि TY लिहायचं. वेलकम लिहायचं असलं कि WC लिहायचं. अगदी मी लिहायचं असलं तरी M लिहतोय आपण. भाषेची खिल्ली उडवल्यागत शॉर्टकट्स तयार केलेत. दोन अक्षरात शब्द आणि भावना दोन्ही समजून घ्याव्या लागतात. कठीण आहे.
वेळ वाचवण्याच्या नादात समोरच्यांच्या भावना आपण पुसून तर टाकत नाहीये ना याच्याशी आपलं घेणं देणं नसतं. इंटरनेट आलं, व्हाट्सअँप आलं, दूरची माणसं जवळ आली. वर्ष-वर्ष बोलणं व्हायचं नाही तरी नातं टिकून राहायचं. आता रोज नावासमोर हिरवा ठिपका दिसतो. पण बोलायला शब्दच नाहीत. रोज रोज काय बोलावं या नादात माणसे दूर झालीत. जवळ काय राहिलं निव्वळ शॉर्टकट्स.
किती एकटा होत चाललंय माणूस कधी अनुभवलंय? आधी माणूस वाक्य होता.. अर्थपूर्ण. मग शब्द झाला.. त्यालाही अर्थ होताच. आता मात्र तो शॉर्टकट होण्याच्या मार्गावर आहे. शॉर्टकट ला अर्थ असेल कि तो निरर्थक असेल? विचार येतो.
आमच्या पिढीला शॉर्टकट्स ची सवय लागली आहे, घरच्यांशी संवाद शॉर्ट झालाय, तो कट होण्याच्या मार्गावर आहे. भीती वाटते.
आमची मुले आमच्यापेक्षा सव्वाशेर असतील यात वाद नाहीच, आईची गरज भासतेच तर आईशी त्याचा शॉर्ट संवाद आणि बापाशी.. बापाशी संवादच कट होईल. गुड नाईट म्हणायला GN लागतो तर मग आई चा A होईल आणि बापाचा B होईल. आपल्या आजोबांच्या पिढीची नावे ‘जयसिंगराज’ पद्धतीची, बाबांच्या पिढीची नावे ‘जयसिंग’ पद्धतीची, आपल्या पिढीची नावे ‘जय’ पद्धतीची.. आता आपल्या मुलांची नावे???? लिहा बाराखडी. क, ख, ग… ज्ञ.
हे भाषेचं झालं हो.. भावनेचं काय? आपण भावनाही शॉर्टकट झाल्यात, वेळेपुरत्या मर्यादित झाल्यात भावना. त्यांनाही शॉर्टकट चा पूर आलाय. समोरचा कितीही आजारी का असेना काळजी घे म्हणायला टेक केयर चा TC होतो, आणि स्लीप वेल चा SW. शब्द शॉर्टकट झालेत याबाबत काहीही नाही परंतु भावना शॉर्टकट होऊ देऊ नका. भावना शॉर्ट झाल्यात कि नातं कट होतं हे पण विसरू नका.! हे झालेत उपदेशाचे बोल.
यावेळी इतकंच.. शॉर्ट मध्ये.

२०३० मध्ये कुणीतरी मला गिफ्ट पाठवेल.. त्यावर लिहिलं असेल..
4m (from) - S
2 (to)  - T.
आता हे कुणी पाठवलं या विचारात दिवस खड्ड्यात जाईल, आणि आपल्या शब्दात DKD अर्थात दिमाग का दही होईल.

-तथागत प्रसेनजीत गायकवाड

Tuesday, 3 January 2017

आठवणी..

भूतकाळातील आठवणींचे काही फुलं
वर्तमानात काहीतरी बहरून येतात,
मग अलगदच पाकळी रूपाने
एक एक क्षण आपल्या आठवणी देऊन जातात

दिशा बदलावणारे वारे, आणि
दशा बदल करणारी परिस्थिती ही
माणसाला खूप काही शिकवून जाते.
शेवटी उरतात त्या  फक्त आठवणीचं,

आठवणींचं एक अतूट नातं असत माणसांशी,
काळ बदलला, माणसे बदलली,
तरीही घट्ट धरून राहतात त्या आठवणीच,
हसऱ्या, बोलक्या, रडक्या असतात त्या आठवणीच,

आठवणींचं काय हो, क्षणात आपल्या
तर क्षणात परक्या होऊन जातात
पण माणसाच्या जीवावर घाव
करून जातात....

माणसांचं काय हो, नेहमी येतात
अन जातात पण उरतात शेवटी
आठवणीच ना...

म्हणून बुवा मी सांगते नेहमी
हसत जगा व हसऱ्या आठवणी जपत जगा..  


- दरशना  धामदार