आपल्या आजोबांच्या पिढीची नावे ‘जयसिंगराज’ पद्धतीची, बाबांच्या पिढीची नावे ‘जयसिंग’ पद्धतीची, आपल्या पिढीची नावे ‘जय’ पद्धतीची.. आता आपल्या मुलांची नावे???? लिहा बाराखडी. क, ख, ग… ज्ञ.
जगणं किती शॉर्टकट केलाय आपण, अगदी मेसेज सारखं.. कुणाला थँक्यू लिहायचं असलं कि TY लिहायचं. वेलकम लिहायचं असलं कि WC लिहायचं. अगदी मी लिहायचं असलं तरी M लिहतोय आपण. भाषेची खिल्ली उडवल्यागत शॉर्टकट्स तयार केलेत. दोन अक्षरात शब्द आणि भावना दोन्ही समजून घ्याव्या लागतात. कठीण आहे.
वेळ वाचवण्याच्या नादात समोरच्यांच्या भावना आपण पुसून तर टाकत नाहीये ना याच्याशी आपलं घेणं देणं नसतं. इंटरनेट आलं, व्हाट्सअँप आलं, दूरची माणसं जवळ आली. वर्ष-वर्ष बोलणं व्हायचं नाही तरी नातं टिकून राहायचं. आता रोज नावासमोर हिरवा ठिपका दिसतो. पण बोलायला शब्दच नाहीत. रोज रोज काय बोलावं या नादात माणसे दूर झालीत. जवळ काय राहिलं निव्वळ शॉर्टकट्स.किती एकटा होत चाललंय माणूस कधी अनुभवलंय? आधी माणूस वाक्य होता.. अर्थपूर्ण. मग शब्द झाला.. त्यालाही अर्थ होताच. आता मात्र तो शॉर्टकट होण्याच्या मार्गावर आहे. शॉर्टकट ला अर्थ असेल कि तो निरर्थक असेल? विचार येतो.
आमच्या पिढीला शॉर्टकट्स ची सवय लागली आहे, घरच्यांशी संवाद शॉर्ट झालाय, तो कट होण्याच्या मार्गावर आहे. भीती वाटते.
आमची मुले आमच्यापेक्षा सव्वाशेर असतील यात वाद नाहीच, आईची गरज भासतेच तर आईशी त्याचा शॉर्ट संवाद आणि बापाशी.. बापाशी संवादच कट होईल. गुड नाईट म्हणायला GN लागतो तर मग आई चा A होईल आणि बापाचा B होईल. आपल्या आजोबांच्या पिढीची नावे ‘जयसिंगराज’ पद्धतीची, बाबांच्या पिढीची नावे ‘जयसिंग’ पद्धतीची, आपल्या पिढीची नावे ‘जय’ पद्धतीची.. आता आपल्या मुलांची नावे???? लिहा बाराखडी. क, ख, ग… ज्ञ.हे भाषेचं झालं हो.. भावनेचं काय? आपण भावनाही शॉर्टकट झाल्यात, वेळेपुरत्या मर्यादित झाल्यात भावना. त्यांनाही शॉर्टकट चा पूर आलाय. समोरचा कितीही आजारी का असेना काळजी घे म्हणायला टेक केयर चा TC होतो, आणि स्लीप वेल चा SW. शब्द शॉर्टकट झालेत याबाबत काहीही नाही परंतु भावना शॉर्टकट होऊ देऊ नका. भावना शॉर्ट झाल्यात कि नातं कट होतं हे पण विसरू नका.! हे झालेत उपदेशाचे बोल.
यावेळी इतकंच.. शॉर्ट मध्ये.
२०३० मध्ये कुणीतरी मला गिफ्ट पाठवेल.. त्यावर लिहिलं असेल..
२०३० मध्ये कुणीतरी मला गिफ्ट पाठवेल.. त्यावर लिहिलं असेल..
4m (from) - S
2 (to) - T.
आता हे कुणी पाठवलं या विचारात दिवस खड्ड्यात जाईल, आणि आपल्या शब्दात DKD अर्थात दिमाग का दही होईल.
-तथागत प्रसेनजीत गायकवाड
No comments:
Post a Comment