Tuesday, 13 December 2016

तू कोण आहेस.?

खरंच,
कोण आहेस तू.?

तू नाव नाहीस जे तुला मिळालंय
तू तुझी उंची नाहीस, वजनही नाहीस
तू लिंग नाहीस
किंवा वयही नाहीस
आणि तू तेही नाहीस जिथे तू असतेस..

तू आहेस तुझी आवडती पुस्तके
आणि ती गाणी जी तुझ्या डोक्यात सतत भिनभिनत असतात
तू आहेस तुझे विचार
आणि तुझा नाश्ता जो तू शनिवारी सकाळी घेतेस

तू आहेस तुझ्यात असलेले हजारो गुण
पण सगळे बघू इच्छितात
तुझ्यात नसलेले लाखो अवगुण

तू ते नाहीस
जिथून तू आलीये

तू आहेस
जिथे तुला जायचंय
आणि मला सुद्धा तिथे जावंसं वाटतंय...


अनुवाद- तथागत गायकवाड

No comments:

Post a Comment