मनाच्या सखोलात काही स्वप्नात काही सत्यात..
व्याहिले मी जिवन मैत्रीच्या सहवासात
पाहीले अनेक संघर्ष धकाधकीच्या या जीवनात
रंगवित अनेक स्वप्ने हृदयाशी आपल्या मनात
काही गोष्टी गेल्या करून भेगा हृदयात
काही होते सुवर्णक्षण माझ्या आयुष्यात
जीवनात होते जे काही दुःख ज्वालांत
हसतं खेळतं मन उतरवलं सर्वस्वात
असा होता जीवनाचा प्रवास...
अखेरच्या काही क्षणांत...
- कांचन पजई
No comments:
Post a Comment